Monday, January 23, 2012

Ajoba Parvat Birth Place of Lav Kush

Ajoba Parvat Samadhi of Valmiki Rishi and Birth Place of Lav Kush

कोकणातील सर्वात उंच शिखर आजोबा पर्वत (१३७६ मीटर) आणि वाल्मिकी ऋषी यांचे समाधी स्थान व  लव  कुश यांचे जन्मस्थान 
Base village: Dehne(डेहणे) Taluka Shahapur Dist Thane
Grade rating of Trek:Moderate to slightly difficult
How to reach Base village:
From Pune/Mumbai/Nasik:
By car/Private vehicle:-After descending Malshej ghat,reach Tokawade ( टोकावडे )  which is on the Ahmednagar Kalyan road.Just after the village ends,take a right turn and follow the road till Dolkhamb (डोळखांब ) and then reach  Sakurli (साकुर्ली ) which is approx 45 kms from Malshej ghat
From Sakurli,the straight road goes Chondhe (चोंढे ) which is a base village to Ratangad from konkan
From this village Sakurli,take a right turn and further after 3 to 4 kms,take left to Dehne village

By Bus/Train,From Pune,you need to reach Kalyan by Bus/Train and then take the Kasara local train till Asangaon (आसनगाव ) and reach Shahapur (शहापूर ) by bus or six seaters 
Shahapur is on National Highway 3 (Mumbai to Nasik) hence easily approachable for people from Mumbai/Kalyan/Nasik.Also there is a shortcut from Kasara to Dolkhamb.Kasara to Dolkhamb is 23 kms hence people from Nasik can bypass Shahapur and can approach Dolkhamb via Kasara. 
From Shahapur,you can get buses going to Dolkhamb/Sakurli
Further Dehne village can be approached by Jeep from Dolkhamb/साकुर्ली
From Dehne,you have to walk 5 kms through dense forests and little bit gentle climb of around 200 meters till Valmiki Rishi Ashram.It takes approx 1.5 hour to reach the Ashram and further 1.5 hour to reach the Sitecha Palna hence total trek is around 3 hours(I completed it is less than 2.5 hours with 1 hour to reach Ashram and somewhat more tan 1 hr to reach Sitecha Palna)
The route from Ashram is easy long walk of 6 kms through dense forests.Beware of snakes and scorpions here.While trekking,I had seen almost 50 to 100 snake skins of all sizes and mainly of Cobra species of snakes.
It takes 1.5 hours to reach Ashram and another 1.5 hour to reach Sitecha Palna the birth place of Lav and Kush.Hence from Dehne till the top,it is around 3 hours trek averagely
and again from top till back to Dehne village,it takes somewhat more than 2 hours 
डोळखांब गाव नंतर तुम्हाला रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पाट्या दिसतील ज्यावर आजोबा पर्वत किती किलोमीटर लांब आहे हे समजेल (कोकणात याला आजा पर्वत असे म्हणतात त्यामुळे डोळखांब गावापासून कोणालाही आजा पर्वत आणि डेहणे गाव विचारले कि कोणीही सांगेल )

डेहणे गावातून आजोबा पर्वत किंवा आजा पर्वत हा जवळ जवळ १२०० मीटर उंचावलेला आहे (म्हणजे पुण्याजवळ च्या तोरणा किल्ल्याचा दुप्पट उंचीचा ) पण डेहणे गावातून आजोबा पर्वताच्या शेंड्या वरती जाता येत नाही . या गावातून तुम्हाला सीतेच्या पाळण्या पर्यंत जाता येते आणि तिथून पुढे आजोबा पर्वताचा शेंडा अजून १५० ते २०० मीटर अजून उंच आहे पण सरळसोट कडे आणि जाण्यासाठी वाट नाही म्हणून आपल्याला पाळण्या पासूनच परत यावे लागते तरी पण ९५० ते १००० मीटर जमिनीपासून चढणे पण सोपे नसते (कोकणातला तो उकाडा आणि १००० मीटर्स ची सरळ चढाई अगदी जीव नकोसा करून टाकते )
आजा  पर्वताच्या शेंड्यावर जाण्यासाठी नगर जिल्ह्यातले कुमशेत हे गाव राजूर मार्गे  गाठावे आणि तिथून दारा घाटाच्या रस्त्याने आजोबा डोंगर चढवा आणि शेंड्या वरती  पोहोचावे .कुमशेत गावातून आजोबा पर्वत ७०० मीटर उंचावलेला आहे आणि मार्ग फार अडचणीचा आहे 

मला डेहणे गावात उल्हासनगर येथून सहलीला आलेल्या शाळा मास्तरांची भेट झाली .मला तर शिखर गाठायचे होते त्यामुळे त्या सहलीतले महिला मंडळ काही वर पर्यंत येणार नव्हते मग माझ्या बायकोला त्यांच्याबरोबर आश्रमा पर्यंत येऊन थांबायला सांगितले आणि मी पुढे चालू लागलो

डेहणे गावापासून वरती जाणारा रस्ता धरावा आणि एक बैलगाडी जाईल अशी रुंद पाउलवाट ,रस्त्याच्या दुतर्फा कधी दाट झाडी तर कधी गवताळ माळरान अशी 5 किलोमीटर ची पायपीट करून आपण एका दाट जंगलात शिरतो . तुम्हाला सगळ्याप्रकारचे आवाज ऐकू येतील (मला १०० मीटर लांबून विजेचा गड कडकडणारा कडक आवाज ऐकू आला तसेच पाला पाचोळ्यात कोणी तरी प्रचंड वेगाने पाळण्याचा आवाज ऐकू आला पण मी दुर्लक्ष करून पुढे चालू लागलो कारण जो पर्यंत दिसत नाही तो पर्यंत काही पण अंदाज लावणे चुकीचे असते

एक गोष्ट स्पष्ट नमूद करतो कि बिबटे माणसापासून लांबच राहणारे प्राणी आहेत म्हणून त्यांच्यापासून घाबरण्याचे काहीच कारण नसते कारण तुम्ही प्राण्यांच्या इलाख्यात आला आहात पण म्हणून प्रत्येक प्राणी हा मनुष्याला घातक असतो असे समजणे साफ चुकीचे .
माणसाने जर जंगलात येऊन काही माकडचेष्टा केल्या तर त्याची फळ भोगावे लागतीलच म्हणून जंगलात जंगलाचे नियम  व  शिस्त पाळावी . माकड चेष्टा करणे केव्हाही वाईट
मी शांत पणे कानोसा घेत मनात कसलीही भीती न बाळगत पुढे चालू लागलो . येथे मी एकटा होतो म्हणून मला ट्रेक पूर्ण करण्याची खात्री होती कारण मी प्रबळ इच्छाशक्तीने  हा ट्रेक करण्यास आलो होतो
मला राजगडाची पुनरावृत्ती करायची नव्हती.

आणखीन १५ मिनिट त्या जंगलात पायपीट करून मी वाल्मिकी ऋषींच्या समाधी आश्रमापर्यंत पोहोचलो .वाल्मिकी ऋषींचा आश्रम आला म्हणजे आपण गावापासून जवळ जवळ १५० ते २०० मीटर चढून आलो आहोत असे समजावे .
वाल्मिकी ऋषींच्या आश्रमा मागून जाणारी वाट हि फारच कठीण आहे म्हणजे तिथून सीतेच्या पाळण्या  पर्यंत अत्यंत खाडी चढण, अरुंद आणि दगड-धोंड्यातून , दोनही  बाजूने असणारे दाट झाडी झुडपे आणि कारवीचे रान आणि त्यातून जाणारी घसरडी आणि काही ठिकाणी मुरमाड वाट आणि या भागात साप विंचू फार आहेत म्हणजे मला खूप ठिकाणी कात टाकलेली सापाची कातडी दिसली(मला कमीत कमी ५० ते १०० ठिकाणी तरी सापाची कातडी दिसली ) आणि सगळी कडे कातडी मला नाग या जातीतील सर्पाची दिसली (साप कोठेही  दिसला नाही ) त्यामुळे झुडपातून,दगडा खालून ,झाडावरून किंवा  आपल्या पाया खाली काय येईल याची सुद्धा काळजी घेणे उत्तम 
हि वाट फारच बिकट आहे आणि पावसाळ्यात या वाटेवरून एक धबधबा वाहत असतो त्यामुळे हि वाट कशी असेल याची कल्पना आली असेलच तुम्हाला आणि या वाटेवरूनच तुम्हाला अजून ६०० ते ७०० मीटर अजून चढायचे आहे हे समजून तर धडकी भरते .
तुम्ही कितीही चढण चढलात तरी पण  अजून शिखर खूप लांब दिसते त्यामुळे खूपच दमछाक करणारी हि चढाई आहे
या खड्या चढणीच्या शेवटच्या टप्प्यात तर अगदी जीव नकोसा होतो इतकी बिकट चढाई आहे एक तर कोकणातील उकाडा ,आणि त्यातून १००० मीटर ची खडी चढण आणि साधारण ८ किलोमेतर ची पायपीट
पण १ तासांच्या चढाई नंतर आपण एका खिंडीत येऊन पोहोचतो .
या खिंडीत थोड्या वर एका कड्या च्या मध्यभागी तुम्हाला एक पाळणा दिसेल आणि तुमच्या भोवताली दाट अरण्य ,दोन्ही बाजूला सुटलेले सरळसोट कडे आणि साधारण अजून १५० - २०० मीटर उंच दिसणारे आजोबा पर्वताचे शिखर .
बस्स येथून पुढे जाण्याचा मार्ग संपतो आणि कितीही मान वरती केली तरीपण नजरेत न सामावणारा कडा  आपल्या दोन्ही बाजूस उभा असतो
सीतेच्या पाळण्या पर्यंत जायचे पण एक वेगळेच दिव्य आहे .तुम्हाला साधारण १५ फुटांचे रॉक क्लायम्बिंग  करावे लागते आणि हे रॉक क्लायम्बिंग जरी छोटे असले तरी पण थोडे अवघड आहे कारण पाय घसरला किंवा तोल गेला तर साधारण ३०० ते ५०० फुट चा खड्डा त्याच्या खाली आहे त्यामुळे थोडे जपूनच रॉक क्लायम्बिंग करावे
सीतेच्या पाळण्याजवळ खिंडीतून फारच अप्रतिम दृश्य दिसते .समोर रतनगड, कात्राबाई ,कळसुबाई , अलंग कुलंग आणि मदनगड तर खिंडीतून पाठीमागे तुम्हाला हरिश्चंद्रगड माळशेज घाट, नाणे घाट इत्यादी तालेवार मंडळींचे दर्शन होते आणि इथली निरीव शांतता तुम्हाला कोठेही मिळू शकणार नाही म्हणजे अगदी फुलपाखराचे हलणाऱ्या पंखांचा सुद्धा आवाज तुम्ही ऐकू शकतात इतकी शांतता या ठिकाणी आहे(हि अतिशयोक्ती नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे )
पुन्हा जपून तो कडा उतरून आश्रमा पर्यंत चालू लागलो आणि ३० मिनिटात आश्रमापर्यंत दाखल झालो
डेहणे गावातील मागून येणारी मंडळी आता आश्रमाच्या  स्वयंपाक करत होती .दुपारचे ३ वाजून गेले होते .स्वयंपाक झालाच होता
उल्हासनगरच्या श्री ठाकरे आणि आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आश्रमाच्या परिसरात एक छोटासा भोजन समारंभ आयोजला होता मग काय त्या भोजना बरोबर बाकी जमलेल्या मंडळींनी आपापले डब्बे काढले  "नाम घ्यावे श्री हरी चे " म्हणत त्या जेवणा वरती तुटून पडलो .
जेवण झाले मग थोड्या वेळ गप्पा झाल्या आणि मग आश्रमाच्या जवळ एक अद्भुत पाण्याचे कुन्ड  बघण्यासाठी निघालो .
आश्रमापासून ५ ते १० मिनाताच्या अंतरावर दाट जंगलात  एक भले मोठे वटवृक्ष आहे आणि त्याच्या मुळा मधून  एक पाण्याचा स्त्रोत सुरु झाला आहे आणि तो खाली असलेल्या दोन कुंडात जातो 
हे पाणी इतके स्वच्ह आणि तजेलदार आहे कि एवढा मोठा डोंगर चढून उतरून आणि केलेली पायपीट यांनी आलेला थकवा केव्हा पळून जातो हे कळत देखील नाही .
आश्रम मध्ये राहणाऱ्या त्या काकींचे विशेष कौतुक वाटते कारण त्या जवळ जवळ २२ वर्षे त्या दाट जंगलात एकटे राहतात . त्यांनी आम्हाला सांगितले कि गेल्या २० - २२ वर्षात कोणत्या प्राण्यांचा सामना केला म्हणजे बिबटे , कोल्हे, तरस रान-डुक्कर आणि वाघ सुद्धा .पण आता बिबटे आणि रानडुक्कर  क्वचित पणे या जंगलात दिसतात पण कधीतरी . या भागात साप,आणि विंचू खूप आहे.त्यांचा सामना तर  रोज होतो.
 
मग आम्ही आश्रमाजवळ आलो आणि परतीचा रस्ता धरला(जातांना मी एकटा होतो पण आता माझ्याबरोबर आणखीन २० लोक होते ),
पुन्हा डेहणे गावापर्यंत पायपीट करून  आम्ही  आपापल्या गावचा रस्ता धरला (आम्ही पुण्याचा आणि त्यांच्या मिनी बस ने उल्हासनगर चा ) 
सकाळी ७ वाजता सुरु झालेला प्रवास हा रात्री १० वाजता संपला 

निश्चितच आजोबा डोंगर एक भेट देण्यासारखे ठिकाण आहे (अर्थात जंगलाची भीती नसलेल्या लोकांसाठी )  

Some photographs

Views of Ajoba Parvat after Dehne village
\Walking towards Valmiki Rishi Ashram from Dehne village
 A grand view of Harishchandragad Kokan Kada after descending Malshej ghat(I never forget mentioning this place if I am nearby to this fort. मला कितीतरी महाभाग भेटले ज्यांना कोकण कडा म्हणजे एक फालतू गोष्ट वाटत होती . कोकण कडा जर फालतू गोष्ट वाटत असेल तर अशा निसर्ग न आवडणाऱ्या लोकांना एक म्हण लागू पडते  --- ला गुळाची चव काय  )

 


 Reached Valmiki Rishi Samadhi Ashram in the dense forests

The peak of Ajoba visible from Valmiki Ashram Premises of Ashram

 Samadhi of Valmiki Rishi inside the Ashram

 वाघ दिसला नाही त्यामुळे वाघाची मावशी बघा आता .Cats near the ashram.Consider them as Tigers and Leopards.What to do nowadays people are killing Tigers,leopards so in future,you will be  able to see only cats in forests
 

The route to go to Sitecha Palna from the ashram.This rigorous route till end is like this
 

   Reaching halfway of Sitecha Palna and Ajoba parvat topmost point is seen in extreme left 
 

Grand view of Ratangad Kalsubai and Alang Kulang Madan forts on way to Ajoba


 Can you believe this?This much steep is the climb for 1200 meters from village

 

 
 Huge walls of mighty Ajoba parvat.The rock walls of Ajoba are having straight drop of 1000 meters which is next to the kokan kada of Harishchandragad

 

 
Finally reached Sitecha Palna the birth place of Lav Kush.This is the cave which can be reached with little bit rock climbing on the edge Little bit adventure to reach the Sitecha Palna.You have to walk on this much narrow wall with around 50 feets deep(It is more deep but due to dense trees,you cant notice the depth)


 Scene from Sitecha Palna. Sahyadris and mighty Harishchandragad behind

 Footsteps of Lav and Kush in the cave

 


 Reached back Ashram after descending.This lady stays alone in this dense forest from around 22 years


 Lunch arranged in Ashram premises by Thakare family of Ulhasnagar


 I found the natural source of spring water in dense forests
 

 Myself near the spring