Tuesday, November 27, 2012

Kalsubai from Chondhe ghat

Climbing Kalsubai from Chondhe ghat->Ghatghar-Uddavne route

एका आगळ्या वेगळ्या वाटेने कळसुबाई शिखर(१६४८ मीटर) चा ट्रेक

ट्रेक सुरु करण्याचे ठिकाण :- चोंढे तालुका शहापूर जिल्हा ठाणे (समुद्र सपाटी वरून उंची ५० मीटर)

चोंढे गावातून साधारण ३ ते ४ कि मी चालत एक डांबरी रस्ता चोंढे धरण पर्यंत गेला आहे तेथून पुढे पायर्या सुरु होतात आणि जवळ जवळ २ तास चढून घाटनदेवी चे मंदिर लागते आणि आपला प्रवेश अहमदनगर जिल्ह्यात होतो . पुढे सपाटी सुरु होते आणि आणखीन २ कि मी चालून भंडारदरा कडे जाणारा डांबरी रस्ता सुरु होतो
येथून जवळ जवळ १३ कि मी चालल्या वरती उडदवणे गाव लागते
म्हणजे एका दिवसात साधारण २६ ते ३० कि मी चालून होते
उडदवणे गावात एक मंदिर आहे जेथे साधारण ५ ते ६ लोकांना  मुक्काम करता येऊ शकतो

उडदवणे गावातून एक अवघड आणि लांबलचक रस्ता कळसुबाई पर्यंत गेला आहे . या मार्गाने प्रथम आपल्याला कळसुबाई क्रमांक २ (१५८० मीटर ) चढावे लागते आणि थोडे उतरले कि नाशिक जिल्ह्यातील इंदोरे गावातून येणारी वाट आपल्या रस्त्याला मिळते . पुढे सरळ चढत गेलो कि आपण वळसा घेऊन कळसुबाई ची शेवटची तिसरी शिडी जवळ येऊन पोहोचतो . येथून शिडी चढलो कि आपण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरती येऊन पोहोचतो . उडदवणे गावातून येथे शिखरावर पोहोचायला ३ तास लागतात पण आम्ही वाटेत एका पाणवठा जवळ जेवण बनवण्यास थांबलो म्हणून आम्हाला २ तास अधिक लागले

ट्रेक चे शेवटचे ठिकाण : बारी, तालुका अकोले, जिल्हा अ . नगर (हे गाव  पर्यटकांसाठी साठी आरंभ ठिकाण आहे )
या ट्रेक चे वैशिष्ट्य
दोन दिवसात एकूण चालणे जवळ जवळ ४५ ते ५० कि मी आणि १६०० मीटर ची चढाई कारण आम्ही जिथून सुरु केला होता ते ठिकाण म्हणजे चोंढे , समुद्रसपाटी पासून फार तर  ५० मीटर उंचीवर असेल त्यामुळे हा ट्रेक महाराष्ट्रातील सर्वोच्च चढाई असलेला ट्रेक आहे यात काहीच वाद नाही आणि या वाटेने कुणी कळसुबाई शिखर गाठले असेल हे सांगता येणे कठीण आहे


कळसुबाई म्हणजे महाराष्ट्राचे Everest कि ज्याचा शिखरावरून पाहिले कि सगळे सह्याद्रीतील डोंगरे खाली दिसू लागतात . याच्या पेक्षा उंच असे कोणतेच ठिकाण महाराष्ट्रात नाही .
पुढे परतीच्या वाटेवर बारी या गावात पोहोचलो

बारी या गावातून कळसुबाई चढून उतरणे यात काहीच नाविन्य राहिलेले नाही हे तिथे आलेल्या महागड्या मोटारी मुळे तर स्पष्ट झाले होते .

बारी या गावातून कळसुबाई चढणे याला आता ट्रेक म्हणता येणार नाही .ट्रेक कसा हवा तर राकट , दांडगा ,दणकट,आव्हानात्मक  आणि तुमची सगळी शक्ती आणि अनुभव पणाला लावणारा असावा .कोणीही यावे आणि शिखर सहज सर करावे याला ट्रेक म्हणता येणार नाही

त्यामुळे बारी या गावातून कळसुबाई चढणे हा ट्रेक न राहता त्याला फक्त एक पर्यटन म्हणता येईल.

कोणताही पर्यटक बारी या गावातून चढून नंतर शिड्या च्या मार्गाने कळसुबाई सर करू शकतो त्यामुळे बारी हून कळसुबाई ट्रेक करणे म्हणजे त्याला एक 'Glamorous Trek' म्हणता येईल किंवा नुसतेच एक                    ' फुसका ट्रेक ' म्हणता येईल कारण हल्ली बारी गावातील वाटेने तर कोणीही कळसुबाई शिखर वरती येत असतो (बारी हून बर्याच वेळा हेच चित्र दिसते कि एक दोन स्थानिक गावकरी सगळे ओझे वाहत असतात  आणि त्याच्या पाठीमागे ऐटीत चालणारी सगळी मंडळी आणि किती तो गडबड गोंगाट,टिंगल टवाळक्या  आणि माकडचेष्टा . काय करणार कारण थेट बारी या कळसुबाई च्या पायथ्या पर्यंत मोठे वाहन जाईल याची व्यवस्था करून दिली ना आता भोगा त्याची फळे . सगळीकडे नुसते व्यापारीकरण झाले आहे .म्हणजे पैसा टाकला कि पोहोचला शिखरावर . बारी गावात असेच चालते म्हणजे कळसुबाई च्या दुसर्या शिडी पर्यंत गाईड ५०० रुपये, शिखर पर्यंत ७०० , एका माणसाचे जेवण १०० रुपये इत्यादी इत्यादी .बारी गावातून तर वाटाड्या ची गरजच भासत नाही ,कुठेच फसवी वाट नाही पण येणाऱ्या लोकांना उगाच फसवण्याचा धंदा बारी गावातून सुरु झाला आहे .बारी गावात तुमचा प्रवेश झाला कि लगेच दोन चार लोक तुमच्या भोवती जमा होतील आणि कळसुबाई च्या शिखर पर्यंत जायला किती भाव होतो ते सांगतील . काय करणार पण या व्यापारीकरण मुळे ट्रेकर्स ना बारी पेक्षा इंदोरे किंवा उडदवणे , पांझरा हीच गावे सोयीचे पडू लागली आहेत . ईश्वरचरणी हीच प्रार्थना कि जसे बारी गावाचे व्यापारीकरण झाले आहे तसे उडदवणे , पांझरे किंवा इंदोरे गावाचे न होवो  )


                                                                  Photos
                                            Day 1

Route from Chondhe village

Towards steps at Chondhe ghat

Towards center of photo see a gap in mountains.From here we climbed up Chondhe ghat to reach Ghatghar

This cage is used for catching crabs by local people.It contained almost 100 crabs inside


Ajoba Parvat while climbing Chondhe ghat

Karoli ghat mountain.Last time we tried to climb from backside of this mountain

Final climb of Chondhe ghat

Ajoba Parvat

Kokan Kada of Ghatghar

Chondhe Dam seen while climbing the ghat

Water source behind Ghatandevi temple at Ghatghar

Ghatandevi temple on top of Chondhe ghat

Mighty Gigantic Ajoba Parvat

Our team climbed chondhe ghat and reached Ghatghar

Water sources on our way to Ghatghar

From Right to Left Alang-Madangad-kulang the 3 most difficult forts in Sahyadris

Myself

Kiran

Near Ghatghar Village

Approached Samrad Village

Total walk on day 1
Chondhe to Ghatghar 14 kms and 700 meters climb
Ghatghar to Uddavne 12 kms on a flat plateau with gentle climb and slopes

Total of 26 kms walking and reaching 728 meters above sea level(Bhandardara dam and its adjoining area is situated 728 meters above sea level as per Survey of India)


                                                          Day 2 Photos


Kalsubai to be climbed from Udadavnevillage.Scene from Uddavne village in morning 6:30 am


Route to Kalsubai from Uddavne

A long long route to Kalsubai(Still not seen in picture)

Alang fort while climbing from Udadavne

Uddavne village seen far below

Bhandardara dam view

Rock patches

Difficult rock patch.Can you guess how we came from this route.Very narrow route with hardly 6 inch to 1 feet route and deep valley below

Rock patch traverse route

At a water source

We started to cook near the water source

Finally at top of Kalsubai from Left to Right Sudarshan->Kiran->Pranav->Myself


Kalsubai from Bari village after descending
A view of Kalsubai seen nearby Randha falls

Total walk on day 2
From Uddavne,Kalsubai is around 900 to 920 meters high

Almost 20 kms walk with climbing 3 peaks Kirda(1187 meters),Kalsubai no 2/Sakira(1580 meters) and Kalsubai(1648 meters)

Thus total trek included walk of around 46 to 50 kms in 2 days and 1600+ meters of climb
This trek is no doubt highest climb in Sahyadris because we climbed highest peak in Sahyadris from almost sea level

4 comments:

  1. Hi Pankaj Sir, totally agree with you that trek should be challenging. i have done kalasubai from bari village and now wish to do the real trek from Udadavane village. it would be great if you could share some more details with me at joymarathi@gmail.com. Thanks a lot for sharing this blog.

    ReplyDelete